महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

                                                    

मुंबई, दि.१३. राज्यातील ज्या भागात ५० टक्के पेक्षा जास्त मुलं मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर त्या गाव, वाडी, वस्ती, तांडा या ठिकाणी ती भाषा अवगत असणाऱ्याच अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

 

   विधान परिषदेत राज्यात उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरु करण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री मुंडे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली राबविली जाते.  केंद्र शासनाने या योजनेंतर्गत धर्म, जात, पंथ, वर्ण व भाषा  यावरुन भेदभाव केलेला नाही.  त्यामुळे राज्यांना उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरु करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

 

           उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरु कराव्यात अशी मागणी होत असेल तरी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही माध्यम निश्चित करण्यात आलेले नाही. अंगणवाडी केंद्रात प्राथमिक शाळांप्रमाणे औपचारिक शिक्षण दिले जात नाही त्यामुळे उर्दू अंगणवाड्या सुरु करण्याची मागणी मान्य करण्यात आलेली नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result